सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

23 नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात रुजू; वर्तणूक आदर्श ठेवा: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना*

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना*

Sudarshan MH
  • Jan 1 2023 7:25PM
*23 नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात रुजू;  वर्तणूक आदर्श ठेवा: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या सूचना*
नंदुरबार : सन 2019 यावर्षासाठी नोव्हेंबर | डिसेंबर 2021 मध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी, लेखी परिक्षा व वैद्यकीय तपासणीमध्ये उत्तीर्ण झालेले 14 पुरुष व 09 महिला उमेदवार असे एकुण 23 उमेदवार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने भरती झालेले आहेत.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने भरती झालेले 14 पुरुष उमेदवारांना दिनांक 29/03/2022 रोजी शारीरिक व कायद्याच्या प्रशिक्षण घेण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे तर महिला उमेदवारांना पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, सांगली येथे पाठविण्यात आले होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले पोलीस अंमलदार दिनांक 29/12/2022 रोजी पुन्हा नंदुरबार जिल्हा पोलीस दलात हजर झाले आहेत.

पोलीस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन आलेल्या पुरुष व महिला अंमलदारांची नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी भेट घेवून त्यांना आपले दैनंदिन कर्तव्य बजावित असतांना सर्व सामान्य जनतेचे लक्ष पोलीसांकडे असते, पोलीसाची प्रत्येक कृती ही समाजावर परिणामकारक असते त्यामुळे जनतेमध्ये काम करीत असतांना पोलीसांची वर्तवणूक नेहमी आदर्श व शिस्तप्रिय असावी. पोलीस दलात काम करीत असतांना नमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच दैनंदिन कर्तव्य पार पाडून स्वत:च्या आरोग्याकडे देखील तेवढेच लक्ष द्यावे. नंदुरबार जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रत्येक पोलीस अंमलदाराने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. प्रशिक्षण घेवून आलेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस दलातील त्यांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री. देवनाथसिंग राजपुत हे उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार