सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले

लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले

Sudarshan MH
  • Dec 30 2022 4:52PM
*रेशन दुकानदाराकडून लाच घेताना गोडाऊन कीपरला रंगेहात पकडले*
 
नंदुरबार - रेशन दुकानाचा परवाना रद्द न होणे व रेशन दुकान ब्लॅक लिस्टमध्ये न टाकणे याकरिता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नावे व स्वतःसाठी लाचेची मागणी करणाऱ्या गोडाऊन कीपरला रंगेहाथ पकडण्यात आले. नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 
याप्रकरणी आरोपी गोडाऊन कीपर ,तहसील कार्यालय ,नंदुरबार दिनेश शामराव रणदिवे, वय-४४ वर्ष, रा. अजंग, ता.जि. धुळे हल्ली रा. प्लॉट नंबर ११ ब, शरद घरकुल, नंदुरबार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अनरद, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील तक्रारदार यांचे संत मीराबाई महिला बचत गट या नावाने रेशन दुकान असून , सदर रेशन दुकानाचा परवाना रद्द न होणे व रेशन दुकान ब्लॅक लिस्टमध्ये न टाकणे याकरिता डी. एस. ओ. / जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नावे व स्वतःसाठी लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश आ. चौधरी यांच्या नेतृत्वात हे कारवाई झाली असून ते अधिक तपास करीत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,  नंदुरबारचे पोनि समाधान वाघ, पोनि माधवी वाघ,  हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, पोलीस नायक अमोल मराठे, देवराम गावित, पोना/मनोज अहिरे, मपोना/ज्योती पाटील, चापोना/जितेंद्र महाले यांचा पथकात समावेश होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार