सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आदिवासी साखर कारखान्यात पूर्ण 'परिवर्तन' ; भरत गावित यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय*

भरत गावित यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय

Sudarshan MH
  • Dec 26 2022 10:50AM

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील डोकरे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या प्रथमच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे भरत माणिकराव गावित यांच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार 14 जागांवर विजयी झाले यामुळे भरत गावित गटाची भाजपा पुरस्कृत सत्ता साखर कारखान्यात स्थापन झाली आहे. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित खासदार डॉक्टर हिना गावित माजी आमदार शरद गावित यांनी परिवर्तन पॅनलच्या बाजूने शक्ती लावली होती. 

परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार असे :
नवागांव गटातून हरिदास जेसा गावीत (२५९६), 
नवापूर गटातून आलु होण्या गावीत (२४७१), देवराम वसंत गावीत (२४२२), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत माणिकराव गावीत (२४०९) 
विसरवाडी गटातून बकाराम फत्तेसिंग गावीत (२५६८), रमेश जाण्या गावीत(२४९१)
खांडबारा गटातून लक्ष्मण धेडू कोकणी (२५०१), रावजी कातक्या वळवी (२४४१)
नंदुरबार गटातून जगन चंद्रा कोकणी(२५६१), रुद्राबाई धरमसिंग वसावे (२४७३)
महिला गटातून मीराबाई पारत्या गावीत (२५०२), संगीता भरत गावीत (२४९०), 
अनुसूचित जाती जमाती गटातून सीताराम शंकर ठाकरे (२६०२),
भटक्या विमुक्त जाती रमेशचंद्र धनसुखलाल राणा (२६४४) 
शेतकरी विकास पॅनल चे विजयी उमेदवार असे: 
नवागांव गटातून शेतकरी विकास पॅनलचे विनोद बाळू नाईक यांना (२३४४)
संस्था या गटातून अजित सुरुपसिंग नाईक तर
इतर मागास वर्गातून आरीफभाई बलेसरिया यांची बिनविरोध निवड झाली.

"परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्यानुसार आदिवासी सहकारी साखर कारखान्यात वर्षानुवर्ष चालत आलेला कारभार बदलण्यासाठी मतदारांनी आमच्या पॅनलला विजयी केले असून परिवर्तन घडवले आहे आमच्या परिवर्तन पॅनलला मतदान करून विश्वास दर्शवणाऱ्या सर्व सभासदांचे आभार मानतो", अशी प्रतिक्रिया परिवर्तन पॅनलचे प्रमुख भरत माणिकराव गावित यांनी दिली. 

 तीस वर्षांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक आणि स्वर्गीय मंत्री माणिकराव गावित यांनी नवापूर तालुक्यात डोकारे येथे पहिला आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापन केला. कारखाना स्थापनेपासून संचालक मंडळाची निवडणूक पाच वेळा बिनविरोध झाली होती. मात्र, आता 25 वर्षानंतर म्हणजे या सहाव्या पंचवार्षिकनिमित पहिल्यांदाच कारखान्याच्या निवडणूकीत मतदानाचा प्रसंग उद्भवला. यात थेट राजकीय गट सक्रिय दिसले. गावित आणि नाईक परिवार एकमेकांसमोर उभे असून, सत्ता कोण काबीज करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक यांचे शेतकरी विकास पॅनल व भाजपाचे भरत गावित यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात ही सरळ लढत झाली. संचालकांच्या १७ जागांपैकी शेतकरी विकास पॅनलचे २ उमेदवार आधीच बिनविरोध झाले आहेत़. १५ जागांसाठी पाच गटांत मतदान झाले. काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १५, तर भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार