सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खेडदिगार मधून चोरलेले वाहन धुळ्यात विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचोरावर एलसीबीने घातली झडप

असलेल्या वाहनचोरावर एलसीबीने घातली झडप

Sudarshan MH
  • Dec 24 2022 7:50AM


नंदुरबार -  स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक किरण खेडकर यांनी तपास चक्र फिरवले आणि खेडदिगर येथून चोरलेले पिकअप वाहन धुळे येथे विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहन चोराला अटक केली. ते वाहन देखील जप्त करण्यात आले असून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13/12/2022 रोजी सांय 05/00 ते दिनांक 14/12/2022 रोजी रात्री 80/00 वा. दरम्यान म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील खेडदिगर गावातील हिरा मोती फर्टिलायझरचे बाजुला श्री. पंडीत गंगाराम चौधरी यांचे 2,00,000/- रु कि पिकअप वाहन MH 39 C 5583 हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेले, म्हणुन फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान,  चोरीस गेलेले वाहन धुळे शहरातील 80 फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला मिळून आले. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या  गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदारांनी ते वाहन चाळीसगांव रोड पोलीस ठाणे येथे आणून उभे केलेले होते. सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करुन धुळे येथे रवाना केले. आरोपी मात्र अद्याप मिळून आलेले नव्हते.

दिनांक 23/12/2022 रोजी अमावस्या असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी दिनांक 22/12/2022 चे 23.00 ते दिनांक 23/12/2022 चे 05.00 वा. दरम्यान संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात नाकाबंदी लावलेली होती. स्वतः नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील हे जिल्ह्यातील प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देत होते. त्यादरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुमारे 8 ते 9 दिवसापूर्वी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील खेडदिगर गावातून चोरी झालेली पिकअप ही बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश येथील सुनिल पावरा, पिंटु ओंकार भिल यांनी मिळून केलेली असून सुनिल पावरा हा सद्या खेडदिगर गावात फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना कळविल्यानंतर त्यांनी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करीत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळवून बातमीची खात्री करून तात्काळ संशयीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी नामे सुनिल पावरा याचा खेडदिगर गावात व परिसरात शोध घेतला असता सुनिल पावरा हा खेडदिगर गावात मारुती मंदीराजवळ मिळून आला. त्याने सुमारे 8 ते 9 दिवसापूर्वी त्याचा नातेवाईक नामे पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी याचे मदतीने खेडदिगर येथून रात्रीच्यावेळी एक पिकअप वाहन चोरी केल्याचे सांगितले. पोलीस आता पिंटू भिलचा तपास करीत आहेत. 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार विनोद जाधव, सजन वाघ, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, गोपाल चौधरी, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार