सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आधारभूत किमतीत कडधान्य खरेदीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ*

किमतीत कडधान्य खरेदीला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Sudarshan MH
  • Dec 24 2022 7:29AM
वृत्त क्रमांक - 773                            दिनांक :23 डिसेंबर,2022

*
*नंदुरबार, दि.23 डिसेंबर,2022 (जिमाका वृत्तसेवा):* जिल्ह्यात खरीप हंगाम 2022-23 मध्ये केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत निश्चित केलेल्या हमीभावाने मका, ज्वारी व बाजरी खरेदीस ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी 20 डिसेंबर, 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी शनिवार,31 डिसेंबर, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस.बी.सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांना मका, ज्वारी व बाजरी विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत: नोंदणीसाठी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या हमीभाव योजनेचा लाभ घेवून मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन ही श्री.सोनवणे यांनी केले आहे.

0000000000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार