*डॉ हेडगेवार सेवा समिती संचलित जळखे आश्रमशाळेत राष्ट्रीय गणित दिवस साजरा
आश्रमशाळेत राष्ट्रीय गणित दिवस साजरा
नंदुरबार - डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ता. नंदुरबार येथे आज दि.22 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील गणिताचे शिक्षक श्री रणवीरसिंग पाडवी यांनी सुंदर चालीवर गणितातील महत्वाच्या संकल्पना वर आधारित गीत गायन करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच विविध गणिताच्या क्लृप्त्या समजावून सांगितल्या.
यावेळी थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यानंतर गणित प्रतिज्ञा सर्वांनी म्हटली. प्राथमिक शिक्षक श्री महेन्द्र निकवाडे व अशोक पाटील यांनी गुणाकार व भागाकार करण्याच्या काही सोप्या टीप्स, पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली.प्राथमिक मुख्याध्यापक श्री प्रमोद सुर्यवंशी यांनी गणित कोडी सोडवायला दिली व मनोरंजन पध्दतीने गणित ज्ञान देण्याचा प्रयत्न केला.यानंतर गणित प्रश्नमंजुषा घेण्यात आली.गणित विषयावर आधारित आकर्षक रांगोळी प्रदर्शन व गणित साहित्य प्रदर्शन सुध्दा यावेळी भरवण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती वळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अशोक पाटील यांनी केले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प