सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लाकडीदांडक्यांनी सामुहिक जबर मारहाण; जिल्हाभरात नाभिक समाजाकडून निषेध*

जिल्हाभरात नाभिक समाजाकडून निषेध

Sudarshan MH
  • Dec 22 2022 10:44AM

नंदुरबार- किरकोळ कारणावरून सहा-सात जणांच्या टोळक्याने दुकानात घुसून दोन जणांना लाठ्या काठ्या दांडके घेऊन जबर मारहाण करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप मुळे उघड झाली. यावरून नंदुरबार शहरासह जिल्हाभरातील नाभिक संघटनांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात कठोर कारवाईचे निवेदन देणे सुरू झाले आहे. 
या प्रकरणी अधिक वृत्त असे की नंदुरबार शहरातील कोकणी हिल परिसरात एका टोळक्याने प्राण घातक हल्ला केल्याचे व्हिडिओ फुटेज प्रसारित झाले त्यात गुंडगिरी करणारे सहा सात जण अत्यंत बेभान होऊन लाकडी दांडक्याने मारहाण करताना दिसत आहेत पोलीस कारवाईची आणि कायदे नियमांचे जराही परवा नसलेले हे गुंड तरुण दहशत माजवताना दिसत आहे. पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नाही का असा प्रश्न यावरून केला जात होता. तथापि ज्यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी तातडीने चार जणांना अटक केली. 
दरम्यान कठोर कारवाई व्हावी अशी मागणी संताप्त नाभिक समाजाकडून जिल्हाभरातून उमटली आहे. नाभिक समाज हितवर्धक संस्था, नंदुरबार नाभिक दुकानदार संघटना, नंदुरबार नाभिक युवा मंच व नंदुरबार नाभिक महिला मंडळाने निषेध नोंदविला आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना नाभिक समाजाने निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील कोकणीहिल येथे सुर्यवंशी हेअर आर्ट या दुकानात अनोळखी चार ते पाच जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करुन कारण नसतांना दुकानाचे मालक दीपक भटु सुर्यवंशी, राकेश भटु सुर्यवंशी व दोन कारागिर या नाभिक समाजाच्या युवकांवर हल्ला केला. यावेळी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने नाभिक समाजातील चारही युवक जखमी झाले आहेत. या युवकांना हाताबुक्क्यांसह लाठ्या-काठ्यांनी मारहाण करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. म्हणुन दुकानात जावुन हल्ला करीत नाभिक समाजाच्या युवकांना मारहाण झाल्याचा निषेध नंदुरबार शहर नाभिक समाज हितवर्धक संस्था, नंदुरबार नाभिक दुकानदार संघटना, नंदुरबार नाभिक युवा मंच व नंदुरबार नाभिक महिला मंडळाने निषेध नोंदविला आहे. तसेच युवकांवर हल्ला करणार्‍या हल्लखोरांवर कठोर कारवाई करुन शासन करण्यात यावी. कारवाई होवुन न्याय न मिळाल्यास नाभिक समाजाकडून जिल्ह्याभरात आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी नंदुरबार नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष धनराज वरसाळे, ट्रस्टी अध्यक्ष नानाभाऊ शिरसाठ, सचिव सुनिल वरसाळे, शहराध्यक्ष दिलीप बोरसे, नगरसेवक किशोर सोनवणे, दिपक शिंदे, मोहन सुर्यवंशी, संजय सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, किशोर सैंदाणे, नारायण शिरसाठ, सागर मोरे, राकेश खोंडे, सुरेश शिंदे, पी.एल.बोरसे, निलेश भदाणे, पुंडलिक पवार, किशोर शिवराम सोनवणे, कृष्णा सुर्यवंशी, गोपाळ सोनवणे, संजय सुर्यवंशी, घनःश्याम नांदेडकर, ज्ञानेश्वर बोरसे, दुर्गेश शिरसाठ, भालचंद्र मंडलिक, दिलीप सुर्यवंशी, बबलु महाले, कृष्णा निकम, राहुल सुर्यवंशी, राहुल सोनवणे, प्रफुल्ल सुर्यवंशी, यतिन अहिरे, मनिष मंडलिक, उमेश वरसाळे, जयेश वरसाळे, अनिल महाले, प्रदिप अहिरे, रविंद्र सोनवणे, किरण सैंदाणे, मुकूंद जगदाळे, जयेश सोनवणे, महेश सोनवणे, हर्षल सोनवणे, राकेश महाले आदींनी निवेदनातून केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार