सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग्रामपंचायत निकाल: जिल्ह्यात काँग्रेसला मोठे यश; नंदुरबार तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादीला एकही ग्रामपंचायत नाही*

नंदुरबार तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादीला एकही ग्रामपंचायत नाही

Sudarshan MH
  • Dec 21 2022 9:12PM

नंदुरबार-  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक म्हणजे 51 ग्रामपंचायती प्राप्त केल्या आहेत. 32 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीला यश मिळाले तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटाने धडगावच्या दुर्गम भागासह 31 ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त केल्याचा दावा केला. नंदुरबार तालुक्यातील रनाळे आसाळणी घोटाळे अशा महत्त्वाच्या गावात भाजपाने वर्चस्व राखले. 

नंदुरबार  जिल्ह्यामध्ये 117 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या नंतर आज सायंकाळपर्यंत त्या निवडणुकीचे निकाल जवळपास सर्व हाती आलेले आहेत.  ग्राम पातळीवरील निवडणुकांमध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जात  नाहीत असे असले तरी तालुक्यातील आजी माजी आमदार यांच्या व जेष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष पुरस्कृत पॅनल प्रमाणे निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तथापि काँग्रेस पक्ष पुरस्कृत उमेदवार आणि सरपंच सर्वाधिक जागी निवडून आल्याचे या निकालात पाहायला मिळाले. 

शहादा अक्कलकुवा धडगाव आणि नवापूर या चार तालुक्यात काँग्रेस पक्षाला अधिक जागा मिळवत असतानाच नंदुरबार तालुक्यात मात्र सपशेल अपयश आल्याचे दिसत आहे. नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाकडून विजयाचा दावा करताना नंदुरबार तालुका सोडून इतर चारही तालुक्यातील ग्रामपंचायतींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पक्षाकडून कळविण्यात आले आहे की काँग्रेस पक्षाने यावर्षी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षाचे नेते व माजी मंत्री एडवोकेट के .सी. पाडवी,  माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार  शिरीषकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष पुरस्कृत लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवड झालेली आहे. अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या  16 ग्रामपंचायती, धडगाव तालुक्यात 21 ग्रामपंचायती, नवापूर तालुक्यात 10 ग्रामपंचायती आणि शहादा तालुक्यात 4 ग्रामपंचायती अशा एकूण 51  ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आलेल्या आहेत .जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये इतर ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते सदस्य पदावर निवडून आलेले आहेत. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व सन्माननीय आजी-माजी मंत्री, आमदार आणि जि प सदस्य व पंचायत समिती सदस्य तसेच काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष व विविध सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

नंदुरबार तालुक्यात 18 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली त्यात एक बिनविरोध असल्याने 17 ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाले होते. 
आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कार्यरत होते. तथापि भाजपा विरोधातील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शिंदे गटाने 17 पैकीं 10 ग्रामपंचायत सरपंचासह सर्व जागांवर विजय मिळविल्याचा दावा केला. शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी धडगाव तालुक्यातील 32 पैकी दहा ग्रामपंचायती शिंदे गटाला मिळाल्याचाही दावा केला. भाजपाने रनाळे असाणे घोटाणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी विजय प्राप्त करत तालुक्यात वर्चस्व राखले. एकंदरीत नंदुरबार तालुक्यात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीने काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला पूर्ण पराभूत करून युतीचे वर्चस्व स्थापन केले आहे. 

अक्कलकुवा ग्रामपंचायत महत्त्वाची मानले जाते या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात उद्धव सेनेने विजय प्राप्त केला. सोरापाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आमदार आमशा पाडवी यांची कन्या मंजू पाडवी या विजयी झाल्या. अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील एकंदरीत 30 ग्रामपंचायतींवर उद्धव सेनेने विजय प्राप्त केल्याचा दावा आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉ अभिजित दादा मोरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्री राऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांची अति दुर्गम भागातील खडकी ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाली. विशेष असे की नर्मदा काटच्या हाती दुर्गम भागातील 9 पैकी 7 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. सिताराम नूरला पावरा सरपंच खडकी. गिता भरसिंग पावरा सरपंच झापी, भुरका मास्तर पावरा सरपंच भादल, सोमा बाई संदीप पावरा सरपंच सिंधी दिगर, सैमाल सरदार पावरा सरपंच बाबरी, लावी बाई शिवाजी पावरा सरपंच उडधा, इंदा बाई सायसिंग चौधरी सरपंच तोरणमाळ यांचा यात समावेश आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार