सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार RTO ऑफिस (लूटमार केंद्र) - भाग - 3

1000rs फी असलेलं दुचाकी वाहन परवाना 2500/- , नसल्यास महिनाभर फेऱ्या मारत राहा

Sudarshan MH
  • Nov 13 2022 7:59AM

*1000rs फी असलेलं दुचाकी वाहन परवाना 2500/- , नसल्यास महिनाभर फेऱ्या मारत राहा*
आजच्या या धकाधकीच्या जीवनात दुचाकी व चार चाकी वाहन ही जीवनाची अत्यावश्यक वस्तू बनली आहे गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या घरात वाहन असणं आवश्यक आहे कोणतेही काम वाहनाशिवाय अशक्य आहे अशी परिस्थिती असून या वाहनासाठी लागणारे वाहन परवाना RTO ऑफिस मधून प्राप्त झाल्याशिवाय आपले लाखोंची वाहन निकामी असल्याचे आपणास जाणवते. आणि याचाच फायदा म्हणून की काय नंदुरबार RTO विभाग यांनी वाहन परवाना देण्यासंदर्भात अक्षरशः लुटमार केंद्र सुरू केले आहे. एक हजार रुपयापर्यंत बनणारे दुचाकीचे लायसन अवघ्या दोन ते अडीच हजारापर्यंत कमिशन घेऊन दिले जाते, चार चाकी वाहन व मोठ्या वाहनांची तर विचारूच नका , हेवी विकल लायसन अक्षरशः 9/10 हजार ला दिले जाते किंवा त्यापेक्षाही जास्त आणि पैसे न भरल्यास वेगळे सांगण्याची गरज नाही की म्हणून महिने महिने फिरून सुद्धा ग्राहकाच्या हाती शेवटी शून्यच गावते, त्या शिवाय RC बुक , गाडी पासिंग , PUC , इन्श्युरांस , चा मलिदा अलग , टेस्ट ड्राइव्ह मध्ये फेल झाल्यास 500 rs चा चहा व पाणी बाटली वेगळी पडते. नाही दिले तर क्युरी नावाची सवत मागे लावली जाते.
एक ना अनेक समस्या स्वतः सुदर्शन न्युज ला त्यांच्या चाहत्यांनी फोन द्वारे कळवले. जनता अगदी बेजार झाली आहे , तवरीतच योग्य कार्यवाही न झाल्यास सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 
RTO विभागास लवकरच सद्बुद्धी लाभो हीच प्रार्थना
*भाग 4 - सोमवार दिनांक 14 रोजी , स्टिंग ऑपरेशन व पुरावा सहित*
केतन रघुवंशी , सुदर्शन न्युज
84217 32333
96377 32333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार