सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार RTO ऑफिस ला मुबलक प्रमाणात वाहन ताफा असताना प्रायव्हेट सुमो हायर करण्याचे गौडबंगाल काय?*

नंदुरबार RTO चेकपोस्ट लूटमार केंद्र - 2

Sudarshan MH
  • Nov 12 2022 9:20AM

'केंद्र शासनाचे आदेश धुडकावून नवापूर व अक्कलकुवा चेकपोस्ट लूटमार केंद्र सुरूच' या शीर्षकाखाली सुदर्शन न्युज ने काल एक न्यूज प्रकाशित केली होती. मोटार मालक कामगार संघटनेच्या पदाधिकारींनी  नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील बेडकी येथे व तसेच अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात सीमेवर खापर गावा पुढे तपासणी नाका म्हणजेच चेक पोस्ट सध्या लूटमार केंद्र प्रमाणे चालू असल्याचे म्हटले आहे त्यावर या वृत्तात प्रकाश टाकण्यात आला होता. 

आता असेही समजते की नंदुरबार RTO ऑफिस ला मुबलक प्रमाणात वाहन ताफा असताना प्रायव्हेट सुमो हायर करण्यात आली आहे. असे करण्याचे गौडबंगाल काय ? 
मिळालेल्या माहिती नुसार सदरचे स्क्वाड हे मात्र परिवहन मंडळाच्या बसेस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी मधील अवैध प्रवासी वाहतूक नियंत्रण साठी असतात. असे असताना त्याचा उपयोग शहरातील  चौफुलींवर उभे राहून रेतीचा मलिदा गोळा करण्यासाठी का केला जातोय? 
 RTO विभागाची कार्यवाही ही संपूर्ण शासकीय वाहन , शासकीय पावती व शासकीय युनिफार्म मध्ये न करता भाडोत्री प्रायव्हेट पंटरांद्वारे केली जाते. या विषयी जनमानसात बरीच उलट सुलट चर्चा आहे.  संपूर्ण भारतात मोदीजी सरकारी कार्यालये व योजनांचे प्रयव्हटाईजेशन करीत असताना नंदुरबार RTO विभागाने यात हिरहिरीने पुढाकार घेत आहे, असंच एकंदरीत पाहायला मिळते. ्मुख्य कार्यालय , बेडकी चेकपोस्ट, खापर चेकपोस्ट व फिरते पथके आता प्रायव्हेट पंटरांच्या स्वाधीन केल्याची खमंग चर्चाही आता नंदनागरीत रंगू लागली आहे.
एकूणच नंदुरबार जिल्हा RTO ऑफिस आता संपूर्ण भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे, मागील काही महिन्यांपूर्वी चॉईस नंबर भ्रष्टाचार ताजा असताना रोजचे हे नवनवीन प्रकरण RTO विभागावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत.
*तूर्त एवढेच उद्या भाग - 3*
केतन रघुवंशी , सुदर्शन न्युज 
84217 32333
96377 32333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार