सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्र शासनाचे आदेश धुडकावून नवापूर व अक्कलकुवा चेकपोस्ट लूटमार केंद्र सुरूच

नंदुरबार - महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर नंदुरबार

Sudarshan MH
  • Nov 11 2022 9:45AM
नंदुरबार - महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेवर नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेले परिवहन विभागाचे तपासणी चेकनाकेवर बेकायदेशीर रित्या वसुली केली जात असताना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष करणे चालले आहे. तपासणी नाक्यावरील म्हणजे चेक पोस्टवरील वसुलीचा मलिदा लक्षात घेऊनच जे तपासणी नाके बंद करायचे आदेश केंद्र सरकार ने दिले असूनही ते चालू ठेवण्यात आले, असंही बोलले जात आहे. 
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील बेडकी येथे व तसेच अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात सीमेवर खापर गावा पुढे तपासणी नाका म्हणजेच चेक पोस्ट अनेक वर्षांपासून चालू आहेत. या आंतरराज्य मार्गावर दर मिनिटाला शेकडो वाहने जात असतात. दिवसाला लाखो रुपयांची वरकमाई चेक पोस्ट माध्यमातून अधिकाऱ्यांना होत असते हे सुदर्शन न्युज ने अनेक वेळा उघड सुद्धा केले आहे. मात्र कार्यवाहीची नावावर मात्र थातूर मातूर कार्यवाही केली जाते आणि त्यामुळे नंदुरबार येथील नियुक्ती मिळावी म्हणून अनेक अधिकारी मोठी बोली लावतात. हा इतिहास सुद्धा लोकांना तोंडपाठ आहे. परंतु हे चेक पोस्ट सध्या लूटमार केंद्र प्रमाणे चालू असल्याचे मोटार मालक कामगार संघटना च्या पदाधिकारींनी सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करावे, असे स्पष्ट आदेश राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केंद्र सरकार तर्फे देण्यात आले होते. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अवर सचिव यांनी माहे जुलै २०१७ पासून राज्यांच्या सीमांवर कोणतेही परिवहन तपासणी नाके असू नयेत असे कळविले आहे. असे असताना नंदुरबार जिल्ह्यातील नाके अद्याप पर्यंत चालू कसे या नात्यांची अधिकृतता आहे का अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले हे प्रश्न मोटर मालक कामगार वाहतूक संघटनांचे जिल्हाध्यक्ष यांनी सुदर्शन न्युज शी बोलताना तक्रार उपस्थित केली आहेत.
*सुदर्शन न्युज , नंदुरबार*
*केतन रघुवंशी*

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार