सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार पोलीसांची अनाथ मुलांसोबत आगळी वेगळी दिवाळी

कोरोनामुळे २ वर्षांनंतर संपूर्ण देश मोठ्या उत्साहात दिवाळी साजरा करीत असताना नंदुरबार पोलीसांनी दिवाळीत अनाथांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.

Sudarshan MH
  • Oct 23 2022 2:53PM

🌈🌈🌈💥💥💥
कोरोनामुळे २ वर्षांनंतर संपूर्ण देश मोठ्या उत्साहात दिवाळी साजरा करीत असताना नंदुरबार पोलीसांनी दिवाळीत अनाथांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून अनाथ मुले व गरीब परित्यक्ता महिला यांचेसोबत मिठाईसह या अनाथ मुलांना कपडे व परित्यक्ता महिलांना साड्या देऊन त्यांचेसोबत दिवाळी साजरी करुन नंदुरबार पोलीसांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. तळागाळातल्या घटकांसोबत आपला आनंद वाटल्यांने तो दुप्पट झाल्याचे समाधान या पोलीसांच्या एरव्ही कडक वाटणाऱ्या चेहऱ्यावर दिसत होता तर दुसरीकडे पोलीसांची ही वेगळी प्रतिमा या अनाथ मुलांच्या व परित्यक्ता महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदात ठळकपणे दिसत होती. 
        या अनाथ मुलांनीही रिटर्न गिफ्ट म्हणून पोलीसांना स्वतःच्या हाताने बनवलेली भेटकार्डे भेट दिली.कागदाच्या पुठ्यांवर स्वःताच्या हाताने बनवलेली ही भेटकार्डे या दिवाळीची सर्वात अनमोल भेट असल्याचे व रिटर्न गिफ्ट देण्याची या मुलांची भावना त्याहून अनमोल असल्याचे नंदूरबारचे  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक कार्यालयात ही भेटकार्डे लावण्यात येणार आहेत.
कार्यक्रम ला उपस्थित मा. Sp सर पि. आर. पाटील तसेंच DYSP हिरे सर, सिटी pi किरण खेडकर सर, LCB pi रवींद्र कळमकर सर, अकलकुवा pi आगरकर सर, pi तालुका राहूल पवार सर,pi पटले सर, ट्राफिक pi नदवाडकर सर, मसावद pi पवार सर,उपनगर API बधाणे, एवढे वरिस्ट अधिकार हजर होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार