सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अस्तंबा येथे निवडणुकीत पॅनल पराभूत झाल्याने जमावाची तिघांना बेदम मारहाण

झाल्याने जमावाची तिघांना बेदम मारहाण

Sudarshan MH
  • Oct 20 2022 2:57PM

धडगाव - अस्तंबा ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल पराभूत झाल्याच्या रागातून जमावाने तिघांना लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अस्तंबा ग्रामपंचायत निवडणुकीत धिरसिंग कोचऱ्या वळवी याचे सरपंच पदाचे उमेदवार व सदस्य पदाचे उमेदवार सह संपूर्ण पॅनल पराभूत
झाल्याने त्याचा रागातून धिरसिंग वळवी,हावका वळवी,इंद्या वळवी, दिनेश वळवी, राहुल वळवी, संदिप वळवी,फोज्या वळवी,कीरण वळवी,नारसिंग वळवी,अमर वळवी, स्वप्नील वळवी,माधव वळवी यांनी गावातील पोपटा गिब्या वसावे यांच्या घरी जाऊन फोज्या हांद्या वळवी, जयसिंग रुप्या वळवी व दिनेश नोवा वळवी यांना लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून अंगणातील १५ खुर्च्या,कुडाचे कंपाऊंड,टाटा स्काय छत्रीचा कॅमेरा आदिंची मोडतोड करून नुकसान केले.सदर घटना १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोस ई प्रविण महाले करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार