सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अपर पोलिस महासंचालकांनी केले शहाद्यात वाचनालयाचे उद्घाटन

राज्याचे अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांनी दि.१९ ऑक्टोबर रोजी शहादा पोलिस ठाण्यात वाचनालयाचे उद्घाटन केले.

Sudarshan MH
  • Oct 20 2022 2:50PM

नंदुरबार:- राज्याचे अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांनी दि.१९ ऑक्टोबर रोजी शहादा पोलिस ठाण्यात वाचनालयाचे उद्घाटन केले.

नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर हे आले आहेत..१९ ऑक्टोबर रोजी त्यांनी शहादा पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय तसेच प्रकाशा पोलिस दूरक्षेत्राला भेट दिली.यावेळी कामकाजाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सूचना केल्या. यावेळी शहादा पोलिस ठाण्यात श्री.कारगावकर यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी पोलिस दलात काम करताना वेळात वेळ काढून नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी असे आवाहन केले.यानंतर पोलिस ठाणे आवारात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, शहादा उप विभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, म्हसावद पोलिस ठाणे निरीक्षक निवृत्ती पवार, सारंगखेडा पोलिस ठाणे निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या सह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार