सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अपर पोलिस महासंचालक यांच्या हस्ते राजमुद्रा स्तंभाचे उद्घाटन

हस्ते राजमुद्रा स्तंभाचे उद्घाटन

Sudarshan MH
  • Oct 19 2022 8:38AM


नंदुरबार - राज्याचे अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांच्या हस्ते दि.१८ रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय मुख्य प्रवेशद्वाराजवळ राजमुद्रा स्तंभाचे व राष्ट्रध्वज आणि पोलिस ध्वजाचे उद्घाटन करण्यात आले.

राज्याचे अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर हे दि.१७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार दौऱ्यावर आले आहेत.श्री.कारेगावकर यांच्या हस्ते दि.१८ रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय मुख्य प्रवेशद्वाराजवळ राजमुद्रा स्तंभाचे व राष्ट्रध्वज आणि पोलिस ध्वजाचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर अपर पोलिस महासंचालक यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या व. अडीअडचणी जाणून घेत समस्यांचे निराकरण केले. तत्पूर्वी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलिस मुख्यालयातील हवालदार विरसिंग बापू वळवी यांच्या सामाजिक कार्याची दखल अपर पोलिस महासंचालक यांनी घेतली.
यावेळी मुख्यालयाचे पोलिस उप अधीक्षक विश्वास वळवी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उप अधीक्षक आत्माराम प्रधान, नंदुरबार उप विभागीय अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उप विभागीय अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक भरत जाधव,वाचक शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन पटले यांच्या सह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार