सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धडगाव येथील पिडीत महिला प्रकरणी पोलिस निरीक्षक व तपास अधिकारींचे निलंबन

पोलिस निरीक्षक व तपास अधिकारींचे निलंबन

Sudarshan MH
  • Sep 25 2022 7:29AM


नंदुरबार - धडगाव येथील पिडीत महिलेची हत्या व बलात्कार प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी धडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे व तपास अधिकारी बी.के.महाजन यांना निलंबित केले आहे.
धडगाव येथील पिडीत महिला प्रकरणी याआधी धडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे व तपास अधिकारी बी.के.महाजन आदींची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. यासंदर्भात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी धडगाव येथे पिडीत महिलेच्या आई वडिलांची नुकतीच भेट घेतली होती. त्यांनी दोषी पोलिस अधिकारी यांची बदली नव्हे तर निलंबन करण्याची मागणी केली होती.सदर प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले होते.दरम्यान चित्रा वाघ यांनी ट्विटरवर धडगावचे पोलिस निरीक्षक व गुन्ह्याचे तपास अधिकारी यांना निलंबित केल्याची माहिती दिली होती.
धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहितेचा सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिच्यावर अत्याचार करुन तिचा खुन केल्याची माहिती पिडीतेच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती.तरीही कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह मिठात पुरुन ४७ दिवस ठेवला होता.सदर प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.पिडीत महिलेचा मृतदेह बाहेर काढून त्याचे पुन्हा शवविच्छेदन केले. पिडीतेच्या आई वडीलांची भेट कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजी मोघे, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासह विविध नेत्यांनी घेतली होती.दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली होती.पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार