सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोख खु.येथे डाकीणीच्या संशयावरून महिलेला जमावाची शिवीगाळ व धमकी

डाकीण असल्याचा संशय घेत जमावाने महिलेला वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मोख खुर्द गावात घडली आहे.याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Sep 19 2022 8:34AM


धडगाव - डाकीण असल्याचा संशय घेत जमावाने महिलेला वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मोख खुर्द गावात घडली आहे.याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोख खुर्द येथील दुकानपाड्यातील पेचरीबाई जान्या वसावे (५०) हि महिला डाकीण असल्याचा संशय घेऊन गावातील सेगा कुत्र्या वसावे,कांदुबाई सेगा वसावे, सुनील सेगा वसावे, गोविंद सेगा वसावे, दिलीप सेगा वसावे,शंकर सेगा वसावे,कांती सेगा वसावे,निर्मला जहांगीर वसावे, शिवाजी कुत्र्या वसावे,पाल्या कुत्र्या वसावे यांनी पिडीत महिलेला तुम्ही जादुटोणा करुन माणसे व गुरे खाऊन टाकले आहे.तुम्हाला गावात राहू देणार नाही असे सांगून वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर घटना ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३वाजता घडली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास इशामोद्दीन पठाण करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार