सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१ लाखासाठी विवाहितेचा छळ भादवडच्या तिघांवर गुन्हा दाखल

गाडी घेण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत यासाठी शहरातील गुरुकुल नगरात राहणाऱ्या विवाहितेचा छळ सासरच्या मंडळींनी केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Sep 16 2022 7:37AM

नंदुरबार - गाडी घेण्यासाठी माहेरुन १ लाख रुपये आणावेत यासाठी शहरातील गुरुकुल नगरात राहणाऱ्या विवाहितेचा छळ सासरच्या मंडळींनी केल्याची घटना घडली आहे.

नंदुरबार शहरातील गुरुकुल नगरात राहणाऱ्या रुपाली प्रताप ठाकरे यांचा विवाह भादवड ता.नंदुरबार येथील प्रताप मधुकर ठाकरे यांच्याशी झाला होता.दरम्यान लग्नानंतर पती प्रताप मधुकर ठाकरे, सासु उशाबाई मधुकर ठाकरे, सासरा मधुकर तुळशीराम ठाकरे यांनी लग्नात विवाहितेचा वडिलांनी हुंडा कमी दिला म्हणून नवी गाडी घेण्यासाठी माहेरुन १लाख रुपये आणावेत तसेच मुलगी झाली म्हणून तिघांनी विवाहितेला उपाशी ठेऊन मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला.सदर प्रकार ८ मे २०१७ पासून ते आतापर्यंत सासरी घडला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार रिबीका नाईक करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार