शेतीच्या वादातून सल्लीबार येथे पती-पत्नीला चौघांची मारहाण
हिस्से-वाटणीच्या वादातून सल्लीबार येथे पती-पत्नीला ४ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे
मोलगी - शेतीच्या हिस्से-वाटणीच्या वादातून सल्लीबार येथे पती-पत्नीला ४ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सल्लीबार येथील बोरीवलपाड्यात शेतीच्या हिस्से-वाटणीच्या वादातून व शेतात शेळ्यांसाठी गोठा बाधल्याचा रागातून गोविंद ठाणसिंग वसावे,ठाणसिंग गुलब्या वसावे,जुनाबाई ठाणसिंग वसावे,गणपत ठाणसिंग वसावे यांनी धर्मा गिंबा वसावे यांना व त्यांची पत्नी शेवंतीबाई धर्मा वसावे यांना हाताबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली.या मारहाणीत शेवंतीबाई यांचा हात फॅक्चर झाला आहे.याप्रकरणी शेवंतीबाई धर्मा वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार दिपक बुनकर करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प