सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आगामी नगरपालिका निवडणुका भाजपा शिंदे गटासोबत एकत्र लढणार!

चंद्रशेखर बावनकुळे

Sudarshan MH
  • Sep 13 2022 8:07PM

-चंद्रशेखर बावनकुळे 

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यातील आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा शिंदे गटासोबत लढणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी १३ सप्टेंबर रोजी नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.

 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  हे १३ सप्टेंबर रोजी नंदुरबार दौऱ्यावर आले आहेत. ते भाजप मेळावा, लोकसभा व विधानसभा कोअर कमिटी बैठक, युवा वॉरीयर शाखेचे उद्घाटन आदी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या विजयपर्व निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार राजेश पाडवी,माजी आमदार शिरीष चौधरी,जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा शिंदे गटासोबत लढणार आहे. त्यासाठी शिंदे गटातील स्थानिक नेत्यांशी चर्चा व विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल. आपसातील मतभेद स्थानिक पातळीवर मिटविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.उदध्व ठाकरे सरकारच्या काळात जे घडले ते आता नंदुरबार जिल्ह्यात घडणार. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील नाराज कार्यकर्ते भाजपात येतील असे ते म्हणाले. शिंदे व फडणवीस सरकारच्या चांगल्या कामामुळे आगामी निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार