सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चरणमाळ घाटात बस दरीत कोसळून भिषण अपघातात चालकासह चिमुकली ठार

३० प्रवासी किरकोळ दुखापती

Sudarshan MH
  • Sep 12 2022 5:55AM


नवापूर - चरणमाळ घाटात १० सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री खाजगी बस खोल दरीत कोसळून भिषण अपघात झाला.या अपघातात बसचालक व दिड वर्षाची मुलगी ठार झाली असून ३० प्रवासी किरकोळ दुखापती झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सटाणा कडून गुजरातच्या जुनागड येथे प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस १० सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री १० वाजता चरणमाळ घाटातील खोल दरीत कोसळली. या भिषण अपघातात बसचालक अफजल मुसाभाई सोढा (४५,रा.जुनागड) व दिड वर्षाची अश्विनी सुरेश माळी (रा.निताणे ता.सटाणा) हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.तर ३० प्रवासी किरकोळ दुखापती झाले आहेत. यांपैकी ३ जणांना गंभीर दुखापत झाली असून जखमींवर नवापूर उप जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. काही प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात पाऊस सुरू असताना प्रवासी झोपेत असताना हा अपघात झाला. अपघात होताच महिला व मुलांसह प्रवाशांनी एकच आक्रोश केला. सदर घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलिस व बोरझर येथील ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले. ४ रुग्णवाहिकेतून जखमी प्रवाशांना नवापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल वळवी व त्यांची टिम तसेच नवापूर डॉक्टर्स असो.च्या डॉक्टरांनी जखमी प्रवाशांवर तातडीने उपचार केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे यांनी रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार