सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भिंतीवर डोके आपटून मित्राचा खुन करणाऱ्या आरोपीला अटक

विसरवाडी पोलिसांची कामगिरी

Sudarshan MH
  • Aug 28 2022 3:35PM


विसरवाडी पोलिसांची कामगिरी

विसरवाडी - नवापूर तालुक्यातील कामोद येथे भिंतीवर डोके आपटून मित्राचा खुन करणाऱ्या आरोपीला विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कामोद येथे दिलीप बाबा गावीत हा गावात आपला मित्र रवींद्र धिरजी गावीत यांच्या घरी दारु पित असताना दिलीपने रवींद्रच्या पत्नी बाबत अश्लील बोलल्याने त्याचा रागातून रवींद्र याने दिलीप गावीत यांचे डोके भिंतीवर आपटून त्याचा खून करुन त्याचा मृतदेह गावातील जंगलात फेकुन दिला होता.याप्रकरणी रवींद्र धिरजी गावीत यांच्या विरोधात विसरवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपी हा पसार झाला होता.त्याला विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली असता आरोपीने दिलीप गावीत याचा खुन केल्याची कबुली दिली.सदर कामगिरी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक भुषण बैसाणे, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप गावीत, पोलिस नाईक अनिल राठोड यांनी केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार