सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विज चोरी केल्याने हॉटेल चालकावर गुन्हा

कोठली शिवारातील उज्वल रेस्टॉरंट अँन्ड मिनरल वॉटर या हॉटेल मध्ये विज चोरी

Sudarshan MH
  • Aug 25 2022 6:20AM

सारंगखेडा - कोठली शिवारातील उज्वल रेस्टॉरंट अँन्ड मिनरल वॉटर या हॉटेल मध्ये विज चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी हॉटेल चालकावर विज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,हॉटेल चालक देवेंद्र संतोष खैरनार यांच्या कोठली शिवारातील उज्वल रेस्टॉरंट अँन्ड मिनरल वॉटर या हॉटेल मध्ये विज कंपनीच्या पथकाने तपासणी केली असता विज कंपनीच्या विज मिटर मधील थ्री फेज वायरला टॅपिंग करुन गेल्या २० महिन्यांपासून विज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.सदर प्रकार दि.१९ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता उघड झाला.याप्रकरणी विज कंपनीच्या भरारी पथकाचे अति.कार्यकारी अभियंता बकुळ मानवटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध सारंगखेडा पोलिस ठाण्यात विज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार