कारचे नुकसान केल्याचा वादातून पती पत्नीला जमावाची मारहाण
उंची शेवडी येथील घटना
नवापूर- कारचे नुकसान केल्याचा वादातून पती पत्नीला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील उंची शेवडी येथे घडली आहे. याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंची शेवडी येथे मारुती इको कारचे नुकसान केले म्हणून भरपाई मागितल्याच्या रागातून स्वप्नील गावीत,सुमन गावीत, मोतीराम मौल्या गावीत,रतिलाल मौल्या गावीत,अजु गावीत, कांतीलाल गावीत,दावीद भेगा गावीत,हरी जतु गावीत (सर्व रा.उंची शेवडी) यांनी गावातील प्रभू ह़ड्या गावीत त्याची पत्नी सुमन प्रभू गावीत या दोघांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सदर घटना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अस इ दिलीप गावीत करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प