खा.हिना गावीत यांच्या प्रयत्नातून बीएसएनएलचे १४५ टॉवर मंजुर
दुर्गम भागात मोबाईल सेवा सुधारणार
नंदुरबार - खासदार हिना गावीत यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील दुर्गम आदिवासी भागात मोबाईल नेटवर्क सुरळीत राहावे यासाठी केंद्र शासनाकडून बीएसएनएलचे १४५ टॉवर मंजुर केले आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील दुर्गम आदिवासी भागात मोबाईल नेटवर्क येत नसल्याच्या तक्रारी खासदार हिना गावीत यांना प्राप्त झाल्या होत्या. मोबाईल नेटवर्क नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सदर समस्या सोडविण्यासाठी हिना गावीत यांनी केंद्र शासनाकडून बीएसएनएलचे १४५ टॉवर मंजुर केले आहेत. यात नंदुरबार ०३, नवापूर १८, तळोदा ०३, अक्कलकुवा २६, धडगाव ४३, साक्री ४९, शिरपूर ०३ असे टॉवर या तालुक्यात उभारण्यात येणार आहेत. या टॉवरमुळे बीएसएनएलचे मोबाईल नेटवर्क सुरळीत होईल.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प