सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वाटचालीचे प्रतिबिंब पुरवणी गॅझे‍टिअरमध्ये उमटावे

*डॉ. दि. प्र. बलसेकर : सर्व विभागांनी माहिती उपलब्ध करून द्यावी*

Sudarshan MH
  • Aug 19 2022 7:03PM

नंदुरबार दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्याचे विशेष जिल्हा पुरवणी गॅझेटिअर तयार करावयाचे आहे. शासनाच्या माध्यमातून तयार होणारा हा महत्वपूर्ण दस्तऐवज असणार आहे. या गॅझेटिअरमध्ये जिल्ह्यात गेल्या 25 वर्षांत झालेल्या विकासात्मक कामांचे प्रतिबिंब उमटावे. यासह संस्कृती, परंपरांच्या सर्वंकष माहितीचा समावेश असावा. त्यासाठी आवश्यक महत्वपूर्ण माहिती संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा पुनवर्सन अधिकारी नितीन सदगीर (ससप्र), जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वास वळवी, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी (प्राथमिक) यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

कार्यकारी संपादक डॉ. बलसेकर यांनी सांगितले, की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुरवणी गॅझेटिअर तयार करण्यात येत आहे. गॅझेटिअरला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या गॅझेटिअरची दखल मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली आहे. विशेष पुरवणी गॅझेटिअरमध्ये जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती, परंपरा, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, पायाभूत सोयीसुविधा, परंपरा, वेशभूषा, ऐतिहासिक वास्तू, विविध प्रकल्प, औद्योगिक प्रकल्पासह विविध सांख्यिकीय आणि विश्लेषणात्मक माहिती उच्च दर्जाच्या छायाचित्रांसह अपेक्षित आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळसारखे पर्यटन केंद्र आहे. या गॅझेटिअरच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देशातच नव्हे, तर जगभर जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढून या जिल्ह्यात रोजगाराच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागप्रमुखाने आपापल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती परिपूर्ण आणि अद्ययावत द्यावी. अमृत महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून या 75 वर्षांच्या विकासाचा आढावा घेवून एक विश्वसनीय आणि वस्तूनिष्ठ दस्तऐवज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी तातडीने माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यासाठी स्वतंत्र समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य सर्व विभाग आपापली माहिती परिपूर्ण आणि छायाचित्रांसह उपलब्ध करून देतील. तसे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही माहिती अद्ययावत करण्याची संधी अन्य विभागांना उपलब्ध झाली आहे. उर्वरित माहिती सर्व विभाग लवकरच उपलब्ध करून देतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी सांगितले. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनीही मौलिक सूचना केल्या. जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार