सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवजात बालकाला रेल्वेच्या सीटवर रडतांना सोडून निर्दयी पालक पसार

चिंचपाडा रेल्वे स्थानक येथे प्रकार उघडकीस

Sudarshan MH
  • Aug 16 2022 11:15AM



नवापूर - तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे स्थानकावर सुरत-नंदुरबार मेमो रेल्वेच्या सीटवर आपल्या नवजात बालकाला रडतांना सोडून अज्ञात निर्दयी पालकाने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरत - नंदुरबार रेल्वे मार्गावर चिंचपाडा रेल्वे स्थानकावर सुरतेहून येणारी सुरत-नंदुरबार मेमो रेल्वे थांबली असता सदर रेल्वेच्या सीटवर एक दहा ते पंधरा दिवसांचे नवजात बालक रडतांना दिसले.प्रवाशांनी सदर बालक कोणाचे आहे याची चौकशी केली असता कोणीही पालक समोर आले नाही.या रडणाऱ्या बाळाला उचलून घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही.शेवटी रेल्वेतील एका फेरीवाल्यांचे एका महिलेच्या मदतीने सदर बाळाला उचलून रेल्वे पोलिसांना कळवले.त्यानंतर सदर बालकाला नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या बाळावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सदर मुलांच्या पालकांबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदर घटना दि.१५ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार