सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डॉ.विजयकुमार गावित यांना तिसऱ्यांदा आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद

आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद

Sudarshan MH
  • Aug 15 2022 6:32AM

नंदुरबार-  राज्याचे कॅबिनेट मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.९ ऑगस्टला मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर १४ ऑगस्ट रोजी खातेवाटप जाहीर झाले.त्यात आमदार डॉ.विजयकुमार यांना आदिवासी विकास विभाग हे खाते देण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणून डॉ.गावीत हे तिसऱ्यांदा पद स्विकारतील.यापूर्वी त्यांच्याकडे हा विभाग असताना त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या.आदिवासी बांधवांना या योजनांचा लाभ मिळवून दिला होता.या विभागामुळे डॉ विजयकुमार गावित यांनी कॉंग्रेसच्या बलाढ्य नेत्यांना अडचणीत आणले होते.अनेक संस्था त्यांनी कॉंग्रेसमुक्त केल्या होत्या.जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मार्केट कमिटी, ग्रामपंचायतीं आदिं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व निर्माण केले होते. सुरुपसिंग नाईकांसारख्या दिग्गज नेत्यांना पराभूत करण्याची किमया त्यांनी करुन दाखवली होती.आता पुन्हा तोच आदिवासी विकास विभाग त्यांना देण्यात आला आहे.त्यामुळे ते कुठला चमत्कार दाखवतात हे येणाऱ्या काळात कळणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार