सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा येथे अमृत महोत्सव दौडचा समारोप

नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित अमृत महोत्सव दौडचा समारोप १४ ऑगस्ट रोजी अक्कलकुवा येथे करण्यात आला

Sudarshan MH
  • Aug 15 2022 6:03AM

नंदुरबार - नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित अमृत महोत्सव दौडचा समारोप १४ ऑगस्ट रोजी अक्कलकुवा येथे करण्यात आला.या कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील व तळोदा उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष हे उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे ७५ किमी अमृत महोत्सव दौडचा शुभारंभ २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री या़च्या हस्ते करण्यात आला होता.यावेळी नंदुरबार तालुका पोलिस ठाणे ते उमर्दे खुर्द अशी ५ किमी दौड आयोजित करण्यात आली होती.यावेळी स्वतः जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी सहभाग घेतला होता. या दौडचा समारोप १४ ऑगस्ट रोजी अक्कलकुवा येथे करण्यात आला.उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मोदलपाडा ते अक्कलकुवा अशी १० किमी दौड घेण्यात आली.यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यानंतर पोलिस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या हस्ते दौड मध्ये पहिले तीन क्रमांक प्राप्त केलेल्या ३पुरुष व ३ महिला पोलिसांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी तळोदा उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे लावण्यात आलेल्या ७५ हजार वृक्षारोपण कार्यक्रमचा गौरव करण्यात आला.यावेळी तहसीलदार सचिन म्हस्के,शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर, तळोदा पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे आदी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार