सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील १४९ ग्रा.पं.च्या निवडणुका

आचारसंहिता लागू, १८ सप्टेंबरला मतदान

Sudarshan MH
  • Aug 13 2022 6:46AM



नंदुरबार- महाराष्ट्रातील ६०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे.यंदा सरपंच लोकांमधून निवडला जाणार आहे.यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील १४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा समावेश आहे. त्यात शहादा तालुक्यातील ७४ व नंदुरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्यामुळे शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातील निवडणुकांची रणधुमाळी पुन्हा सुरू होईल.राजकीय वातावरण तापेल. भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे पॅनल उभे राहून कोणाच्या किती ग्रा.पं निवडून येणार, किती सरपंच कोणत्या पक्षाचे येतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं. राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी दि.१२ ऑगस्टला ६०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.त्यानुसार शुक्रवारी आचारसंहिता लागून १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे.नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान भरता येतील.अर्ज छाननी २ सप्टेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत, १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे.मतमोजणी १९ सप्टेंबरला होईल, अशी माहिती दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार