पोलिस महानिरीक्षक यांच्या उपस्थितीत शहादा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
शहादा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
शहादा - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दि.८ ऑगस्ट रोजी शहादा येथे नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ बी.जी.शेखर पाटील यांच्या उपस्थितीत ५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.
शहादा येथील महावीर हायस्कूल व डोंगरगाव शिवारात हे वृक्षारोपण करण्यात आले. बिर्ला मुंडा चौक ते महावीर हायस्कूल या ३ कि.मी. पर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा विविध शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी ७५ फुटाचा तिरंगा ध्वजाची रॅली काढली.वंदे मातरम,भारत माता की जय,अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान महावीर,भारत माता व सरस्वती देवींच्या प्रतिमेचे पूजन व दिपक प्रज्वलन मान्यवरांनी केले.यानंतर महावीर चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन रमेशचंद्र चोरडिया यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ बी.जी.शेखर पाटील व पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांचा सत्कार केला.यावेळी बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ बी.जी.शेखर पाटील म्हणाले,आज देशात सर्वात मोठी समस्या पर्यावरण संवर्धन ही आहे.याकरिता नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे ७५ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.असे ते म्हणाले.डीजे मुक्त मिरवणुका काढून नंदुरबार जिल्ह्याने एक चांगला आदर्श घालून दिला आहे.यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी डीजे मुक्त मिरवणुका काढणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील २३५ सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रशंसापत्र देऊन केला.
सदर कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उप अधीक्षक आत्माराम प्रधान, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, महावीर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एस.एम.पाटील, महावीर चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव पारस देसरडा,माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील,शहादा पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक भरत जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प