सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

म्हशींच्या तबेल्यात तिघांना मारहाण १७ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

१७ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • Aug 4 2022 5:31PM


नंदुरबार - मारहाण करु नका असे सांगितल्याने जमावाने एकासह दोन महिलांना शहरातील हनुमान पेट्रोल पंपामागील म्हशींच्या तबेल्यात बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी १७ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हनुमान पेट्रोल पंपामागील म्हशींच्या तबेल्यात दि.२ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता अंकुश सखाराम चित्रकथे (४९,रा.हनुमान पेट्रोल पंपामागे) याचे मालक शरद चित्रकथे व त्यांच्या नातेवाईकांना काही जण मारहाण करीत होते.दरम्यान अंकुश सखाराम चित्रकथे यांनी मारहाण कशाला करता अशी विचारणा केली असता त्यांना जमावाने काठीने बेदम मारहाण करून त्यांचे डोके फोडले.यावेळी त्यांच्या शालकाची आई रंगुबाई, बहिण माया,वहिणी गंगा यांना लक्ष्माबाई यांनी मारहाण केली.याप्रकरणी अंकुश सखाराम चित्रकथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात सुरेश गंगाराम चित्रकथे, महेंद्र सुरेश चित्रकथे,सोनु संजु चित्रकथे, लक्ष्मीबाई संजु चित्रकथे,गोलु गोण्या चित्रकथे, लकी संजु चित्रकथे मोन्टी संजु चित्रकथे व इतर ८ ते १० जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोस ई प्रविण पाटील करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार