सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलिस दलातर्फे २५ हजार वृक्षारोपण

पोलिस दलातर्फे २५ हजार वृक्षारोपण

Sudarshan MH
  • Aug 4 2022 9:13AM
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

पोलिस दलातर्फे २५ हजार वृक्षारोपण

नंदुरबार - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलिस पोलिस दलातर्फे नंदुरबार जिल्ह्यात ७५ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेण्यात आला असून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याने सर्वत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे ७५ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेण्यात आला.या मोहिमेचा शुभारंभ विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय येथे वृक्षारोपण करुन करण्यात आला.यावेळी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस उप अधीक्षक विश्वास वळवी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर आदी.अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.१२पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालय,शाळा, महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले आहे.तर १५ ऑगस्ट पर्यंत उर्वरित वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

नागरिकांनी आपल्या घरांवर
तिरंगा ध्वज लावावा- पोलिस अधीक्षक 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिक प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज लावावा असे आवाहन पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार