सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पत्नीशी संबंध असल्याचा संशय केलपाडा येथे दोघांना मारहाण

संबंध असल्याचा संशय केलपाडा येथे दोघांना मारहाण

Nandurbar. MH
  • Jun 28 2022 5:58AM

परस्पर विरोधी फिर्यादीवरून १८ जणांवर गुन्हा

नवापूर - पत्नीशी संबंध असल्याचा संशयावरून दोघांना मारहाण झाल्याची घटना केलपाडा गावात घडली   आहे.याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केलपाडा येथील जगदिश सुधाकर वसावे यांच्या पत्नीशी प्रताप जालमसिंग वळवी (४७) यांचे संबंध आहेत.तो नेहमी तिच्याशी बोलतो.तिला भेटण्यासाठी जातो.असे बोलून प्रताप जालमसिंग वळवी याला देवेंद्र भिमसिंग वळवी, अशोक वेच्या वळवी, संदिप अरुण वसावे, जगदीश सुधाकर वसावे, दिलीप बालाजी वसावे,बितेश देविदास वळवी, रोहित ईश्वर वळवी, आकाश किशोर वसावे, शंकर नथ्थू वसावे,विरसिंग शंकर वसावे, देविदास हुमना वसावे, निलेश देविदास वळवी,नरेश सुरुपसिंग वळवी (सर्व रा.केलपाडा) यांनी हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करून वाईट शिवीगाळ केली.जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या घटनेत जगदिश सुधाकर वसावे हा प्रताप जालमसिंग वळवी यांच्याशी आपल्या पत्नीशी संबंध आहेत, असं गावात सांगतो म्हणून जगदिश सुधाकर वसावे याला  प्रताप जालमसिंग वळवी, अतुल विजय वळवी,नंदु निमजी वळवी,मैशक अजना वळवी, राजेश रमेश गावीत (सर्व रा.केलपाडा) यांनी बेदम मारहाण केली.वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास असई बळवंत वळवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार