सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बोलेरो गाडी दोनशे फूट खोलदरीत कोसळून अपघात, १ ठार तर ७ प्रवासी जखमी

वेलखेडी रस्त्यावरील तीव्र उतारावर प्रवासी बोलेरो गाडीचे नियंत्रण सुटून बोलेरो दोनशे फूट खोल दरीत

Nandurbar. MH
  • Jun 25 2022 4:18PM


धडगाव - गोरंबा - वेलखेडी रस्त्यावरील तीव्र उतारावर प्रवासी बोलेरो गाडीचे नियंत्रण सुटून बोलेरो दोनशे फूट खोल दरीत कोसळली.या अपघातात १ जण जागीच ठार झाला आहे तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,गाडी चालक किरता कागडा राहावे (रा.गोरंबा) हा आपल्या ताब्यातील बोलेरो गाडीमध्ये प्रवासी बसवून गोरंबा-वेलखेडी रस्त्याने जात असताना तीव्र उतारावर गाडीचे नियंत्रण सुटून बोलेरो थेट दोनशे फूट खोल दरीत कोसळली.या अपघातात मानसिंग बाब्या वळवी ( ६०,रा.वेलखेडी) हे गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर गाडीमध्ये बसलेले दाज्या गोमऱ्या वळवी,सिवा जातऱ्या वसावे,,नारसिंग तुल्या वळवी,वावटी संध्या वसावे,नारसिंग पोहल्या वसावे (सर्व रा.चेंगलापाणी), किसन ओल्या वळवी (गोरंबा), कांतीलाल मानसिंग वळवी (रा.वेलखेडी) हे सर्व जण गंभीर दुखापती झाले आहे.सदर घटना दि.२३ जुन रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.कांतीलाल मानसिंग वळवी (रा.वेलखेडी)  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडी चालक किरता कागडा राहावे (रा.गोरंबा) यांच्या विरोधात धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोसई दिलीप महाजन करीत आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार