सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्ह्यात ५९ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे नंदुरबार जिल्हा पोलिसांची धडक मोहीम

नंदुरबार जिल्हा पोलिसांची धडक मोहीम

Sudarshan MH
  • Jun 20 2022 6:24AM


नंदुरबार- जिल्हा पोलिस दलातर्फे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात आली.याअंतर्गत ५५२ वाहनांची तपासणी करण्यात आली.तपासणीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या ५९ वाहनचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ बी.जी.शेखर पाटील यांनी रस्ते अपघात गुन्हे आढावा बैठकीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात दि.१८ जुन रोजी रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान विशेष मोहीम राबवुन २० ठिकाणी नाकाबंदी करून ५५२ वाहनांची तपासणी केली असता त्यात ५९ वाहनचालक दारु पिऊन वाहन चालवताना मिळुन आले.याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे,शहादा उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि संदिप पाटील यांच्या सह सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व १५ दुय्यम अधिकारी तसेच १०७ पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार