४३ लाखांत शेतकऱ्याची फसवणूक खेडदिगरच्या दोघां केळी एजंटावर गुन्हा दाखल
फसवणूक खेडदिगरच्या दोघां केळी एजंटावर गुन्हा दाखल
तळोदा- येथील एका शेतकऱ्याचा शेतातून ४३ लाख रुपये किंमतीची केळी कापून नेत केळी विक्रीतून आलेले पैसे परत न देता खेडदिगर ता.शहादा येथील दोन केळी एजंटांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळवे येथील शेतकरी संजय गबा पाटील यांनी आपल्या मालकीच्या शेतात केळी लावली होती.सदर केळीचा सौदा बाजारभावाने खेडदिगर ता.शहादा येथील श्री कृष्णा फ्रुट सप्लायर्स अँन्ड कमिशन एजंटचे मालक किसन गबाजी पवार व सुनील गबाजी पवार दोघे रा.खेडदिगर यांनी केला होता.सदर केळीची शेतातून कापणी करून तिची विक्री करुन सुमारे ४३ लाख रुपये आज देतो, उद्या देतो असे सांगून पैसे परत न करता फसवणूक केली.सदर प्रकार दि.२४ फेब्रुवारी ते ९ जुन दरम्यान घडला.याप्रकरणी संजय गबा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि अविनाश केदार करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प