सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आता नंदुरबारहुन दररोज मुंबईला जाण्यासाठी रेल्वेगाडीची सुविधा

लोकप्रिय खा. डॉ.हिना गावीत यांनी केला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

Sudarshan MH
  • Jun 9 2022 6:26AM



नंदुरबार- रेल्वेने नंदुरबारहुन  थेट मुंबईला जाण्याची नंदुरबार करांची प्रतिक्षा आता संपली असुन नंदुरबारच्या लोकप्रिय खासदार डॉ.हिना गावीत यांनी दि.८ मे बुधवार रोजी नंदुरबार रेल्वे स्थानकावरुन नंदुरबार ते मुंबई सेंट्रल या रेल्वे गाडीचा शुभारंभ केला.

गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबारहुन थेट मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची सोय नव्हती.नंदुरबारहुन मुंबई जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची होती.परंतु कोणीही या मागणीकडे लक्ष दिले नाही.खासदार डॉ.हिना गावीत यांनी रेल्वे मंत्रालयात सतत पाठपुरावा करून रेल्वे मंत्री यांना नंदुरबार येथुन मुंबईला जाण्यासाठी रेल्वे सुरु करण्याचे महत्त्व पटवून दिले.अखेर त्यांच्या मागणीला मान्यता देण्यात आली.नंदुरबारहुन थेट मुंबईला जाण्यासाठी नंदुरबार ते मुंबई सेंट्रल ही  दररोज ये-जा करणारी रेल्वेगाडी दि.८ बुधवार रोजी सुरू करण्यात आली.खासदार डॉ.हिना गावीत यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावर सदर रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.या रेल्वेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुंबई मंत्रालयातील कामासाठी,व्यापाऱ्यांना हि रेल्वे सोयीची ठरणार आहे.आदिवासी बांधवांना रोजगार, दवाखान्याचे काम आदी.कामांसाठी ही रेल्वे उपयोगी पडेल.विशेष म्हणजे या रेल्वेमुळे नंदुरबार हे शहर मुंबई महानगराशी कनेक्ट झाले आहे.
नंदुरबार ते मुंबई सेंट्रल ही रेल्वे दररोज नंदुरबार रेल्वे स्थानकावरुन दुपारी २ वाजता रवाना होईल.मुंबईला रात्री १२.५० वाजता पोहोचेल.तर मुंबई सेंट्रल येथुन रात्री १०.३० वाजता निघून सकाळी ९.५० वाजता नंदुरबार येथे आगमन होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार