सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हर घर दस्तक’ अभियानातंर्गत* *जुलै अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा*

जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Sudarshan MH
  • Jun 8 2022 4:29PM

नंदुरबार, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच संभाव्य चौथ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याकरिता जिल्ह्यात 1 जून ते 31 जुलै, 2022 या कालावधीत ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला अधिक गती देऊन जुलै अखेरपर्यंत  पहिला डोस राहिलेल्या नागरिकांचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.वि) कृष्णा राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्याकरिता लसीकरण न झालेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे. ज्या गावात 50 टक्क्यापेक्षा कमी लसीकरण झाले आहेत त्याठिकाणी लसीकरणास गती देवून 100 टक्के लसीकरण होईल. यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. त्यासाठी तालुकास्तरावर उद्दिष्ट देण्यात यावेत. तालुका व गावनिहाय लसीकरणासाठी शिल्लक लाभार्थ्यांची माहिती घ्यावी. लवकरच शाळा सुरु होत असल्याने 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे शाळेतच लसीकरण करावे. त्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे. हर घर दस्तक मोहिमेतंर्गत विशेष शिबिर आयोजनाचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

लसीचा पहिला डोस घेणे प्रलंबित असलेल्या 4 लाख 56 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. दुसरी मात्रा घेणे प्रलंबित असलेल्या 8 लाख 16 हजार लाभार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात यावे. 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. त्यासाठी लसीकरण प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या यादीनुसार घरोघरी भेट देऊन लसीकरणासाठी प्रोत्साहीत करुन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘हर घर दस्तक’ अभियानात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी यावेळी केले.

डॉ. चौधरी म्हणाले की, जिल्ह्यातील 15 लाख 75 हजार 200 लाभार्थ्यांपैकी 11 लाख 18 हजार 761 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 7 लाख 58 हजार 610 लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणासाठी  जिल्ह्यात 1 लाख 34 हजार 210 डोस उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना लसीकरण, तसेच कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्यात.
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार