नंदुरबारात अब्दुल शेखच्या घरातुन साडे ६ लाखांची अवैध तंबाखू जप्त
एलसीबीची धडक कारवाई
एलसीबीची धडक कारवाई
नंदुरबार- शहरातील पटेल वाडीत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून अब्दुल शेख याच्या घरातुन ६ लाख ४२ हजार रुपये किंमतीची प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. एलसीबीच्या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मासिक गुन्हे आढावा बैठकीत पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अवैध गुटखा विक्री वर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.दरम्यान दि.६ जुन रोजी नंदुरबार शहरातील पटेल वाडीत एका इसमाने अवैध गुटखा साठवणूक केल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक यांना मिळाली.याबाबत कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पटेल वाडीत मशीदीसमोर असलेल्या घरात धाड टाकून अब्दुल हमीद शेख (रा.पटेलवाडी, नंदुरबार) याला ताब्यात घेऊन घरातील गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये ६ लाख ४२ हजार रुपये किंमतीची ९ हजार ३२७ पॉकीटे प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू मिळुन आली.संशयीत अब्दुल हमीद शेख याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि संदिप पाटील, हवालदार राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, अभिमन्यू गावीत,दिपक न्हावी,अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प