सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तलवारीने वाढदिवसाचा केक कापला प्रकाशा येथील तरुणाला अटक

वाढदिवसाचा केक कापला प्रकाशा येथील तरुणाला अटक

Sudarshan MH
  • Jun 8 2022 6:14AM


शहादा- प्रकाशा येथील एका तरुणाला तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे महागात पडले असुन पोलिसांनी थेट कारवाई करुन त्याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात जि.प.व पं.स.पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दि.२जुन ते १६ जुन पर्यंत मनाई आदेश व शस्त्रबंदी आदेश लागू केले आहेत.याच दरम्यान प्रकाशा येथील अजय विजय गावीत (रा.मंजुळाहट्टी,प्रकाशा) याने दि.५ जुन रोजी प्रकाशा येथील हॉटेल गौरव जवळ आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी अजय याने वाढदिवसाचा केक धारदार तलवारीने कापला.सदर वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित होऊन समाजात चुकीचा संदेश जात असल्याने पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एका पथकाला प्रकाशा येथे पाठवुन संशयित अजय विजय गावीत याला तलवारीसह अटक केली आहे.याप्रकरणी शहाला पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम व मनाई आदेश उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार