सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकसाठी* *मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी*

मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी*

Nandurbar. MH
  • Jun 3 2022 5:26PM
*
*जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांची आस्थापनांना सूचना*


नंदुरबार, दि.3(जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत नवापूर तालुक्यातील निवडणूक विभाग क्र.52 चितवी व पंचायत समिती अंतर्गत अक्राणी तालुक्यातील निर्वाचक गण क्रमांक 29 असली पोटनिवडणूकीसाठी रविवार 5 जून 2022 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी संबंधित मतदारांना भरपगारी सुटी किंवा पुरेशी सवलत द्यावी, अशा सूचना जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांनी दिल्या आहेत. 


श्री. रुईकर यांनी म्हटले आहे, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचीत राहतात. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे.  

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदार क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी,कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असेल तरी ही त्यांना निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुट्टी देण्यात यावी.  ही सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने आदींना लागू राहील.(उदाहरणार्थ खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर,  मॉल्स, रिटेलर्स आदी).

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे देणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधितांसोबत मालकांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींचे मालक, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे पालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. सर्व उद्योजक, आस्थापना, मालकांनी त्यांच्या उद्योगात, आस्थापनेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदार कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वर नमूद केल्याप्रमाणे सुट्टी अथवा सवलत द्यावी.
00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार