सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार* *विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद

Nandurbar. MH
  • May 29 2022 9:06PM



नंदुरबार, दि.29 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मंगळवार, 31 मे 2022 रोजी सकाळी 10.15 ते 10.50 या वेळेत राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरूपात तर सकाळी 11 ते दुपारी 12.10 या कालावधीत सिमला (हिमाचल प्रदेश) येथून केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. 

पंतप्रधान श्री.मोदी यांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. संवादाचा पहिला भाग राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरूपात सकाळी 10.15 वाजता सुरु होईल आणि सकाळी 10:50 वाजता समारोप होणार आहे. संवादाच्या दुसऱ्या भागात राज्य आणि जिल्हा स्तरावरील कार्यक्रम शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडला जाणार असून पंतप्रधान श्री.मोदी हे निवड केलेल्या योजनांच्या जिल्ह्यांसोबत निवडक लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील चॅनेलवर केले जाणार असून युट्यूब आणि NIC चॅनलद्वारे वेबकास्ट देखील केले जाणार आहे. 

प्रधानमंत्री हे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र- एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर, प्रधानमंत्री मुद्रा योजना आदी 13 योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, लोकप्रतिनिधींसह वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

00000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार