सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खांडबारा स्थानकावर चालत्या मेमो रेल्वेतून २ युवकांवर चाकूने हल्ला

नवापूर- उधना-पाळधी मेमो रेल्वे डब्यात झालेल्या वादातून २ युवकांवर चालत्या रेल्वेतून चाकूने हल्ला झाल्याची घटना

Nandurbar MH
  • May 27 2022 9:29PM

नवापूर- उधना-पाळधी मेमो रेल्वे डब्यात झालेल्या वादातून २ युवकांवर चालत्या रेल्वेतून चाकूने हल्ला झाल्याची घटना दि.२७ मे रोजी दुपारी ४वाजता खांडबारा रेल्वे स्थानकावर घडली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, उधना-पाळधी मेमो रेल्वे डब्यात दि.२४ मे रोजी दोन गटात वाद झाला.दरम्यान सदर मेमो रेल्वे दुपारी ४ वाजता खांडबारा रेल्वे स्थानकावर थांबली असता रेल्वेत पाणी विक्री करणारे जगदीश रमेश शिंदे (२०), दशरथ साहेबराव शिंदे (२१, दोघे रा.बर्डीपाडा) हे दोघे तरुण खाली उतरले असता दोन अज्ञात इसमांनी चालत्या रेल्वेतून दोघांवर चाकूने हल्ला करून दुखापती केले.जखमी तरुणांवर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रेल्वे पोलिस स्टेशनचे हवालदार प्रवीण अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.याबाबत रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार