सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोमाई नदीवरील पुलाजवळ तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

प्रकाशा- प्रकाशा-शहादा रस्त्यावर गोमाई नदीच्या पुलाजवळ २१ मे रोजी रात्री ८.३० वाजता मालट्रक, बोलेरो गाडी व

Nandurbar . MH
  • May 22 2022 2:46PM
गोमाई नदीवरील पुलाजवळ तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार   संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
प्रकाशा- प्रकाशा-शहादा रस्त्यावर गोमाई नदीच्या पुलाजवळ २१ मे रोजी रात्री ८.३० वाजता मालट्रक, बोलेरो गाडी व मोटारसायकल यांचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात लहान शहादे येथील तरुण जागीच ठार झाला आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने शहादा-प्रकाशा रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, लहान शहादे येथील रहिवासी सचिन प्रल्हाद पाटील (हमु.बहुरुपा) हे दि.२१ मे रोजी शनिवारी रात्री साडेआठ वाजता  प्रकाशा येथुन शहादाकडे मोटारसायकलीने जात असताना गोमाजी नदीच्या पुलाजवळ भरधाव मालट्रक, बोलेरो गाडी व त्यांच्या मोटारसायकलीचा तिहेरी अपघात झाला.या अपघातात रस्त्यावरील खड्ड्यात पडून सचिन पाटील हे गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर दुचाकीवर मागे बसलेली महिला जखमी झाली आहे.अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.जखमी महिलेला पुढील उपचारासाठी शहराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर अपघात हा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला आहे.या रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.सदर अपघाताची माहिती मिळताच प्रकाशा व डामरखेडा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करुन मयत तरुणाला नुकसान भरपाई द्यावी तसेच रस्त्याचे काम त्वरित सुरू करावी अशी मागणी केली.रास्तारोकोमुळे प्रकाशा-शहादा रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.शहादा व प्रकाशा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करुन वाहतूक सुरळीत केली.मयत सचिन पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार