सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रकाशा येथे ज्वेलर्स दुकानातुन दोन महिलांनी केले ७ लाखांचे सोने चोरी

शहादा- प्रकाशा येथे परीणीता ज्वेलर्स या दुकानातुन दोन महिलांनी हातचलाखी करून ७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे

Sudarshan MH
  • May 22 2022 2:41PM

शहादा- प्रकाशा येथे परीणीता ज्वेलर्स या दुकानातुन दोन महिलांनी हातचलाखी करून ७ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेला प्लॉस्टिकचा डबा चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चोरीचा हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,प्रकाशा येथे सोनार गल्लीतील प्रितीचा ज्वेलर्स या दुकानात दि.२० मे रोजी सकाळी नऊ वाजता एक महिला आणि तिच्या सोबत एक मुलगी आली.यावेळेस दुकानातील कर्मचारी साफसफाई करीत होते.तर दुकान मालक बाळु सोनार व अश्विन सोनार हे दोघे घरात काम करीत होते.ही संधी साधुन दुकानाच्या काउंटर जवळ बसलेल्या महिलेने कर्मचाऱ्यांची नजर चुकवून काउंटर खाली हात टाकून सोन्याचे दागिने असलेला प्लॉस्टिकचा डबा चोरुन नेला.या डब्यात ७ लाख रुपये किंमतीचे ७५ ग्रॅम वजनाचे सोने होते.सदर प्रकार हा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून सदर महिलांचे दोन साथीदार दुकानाबाहेर वाट पाहत असल्याचे दिसते आहे.सदर घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी भेट देऊन घटना स्थळांची पाहणी केली.पोलिसांच्या श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढला.याप्रकरणी शहराला पोलिस ठाण्यात चोरी चार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार