शेवटचा पेपर देण्यासाठी जाणाऱ्या तरुणीला भरधाव ट्रालाने चिरडले नवी सावरट येथे भिषण अपघात
नवापूर येथे शेवटचा पेपर देण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या तरुणीला भरधाव ट्रालाने चिरडल्याने तरुणी जागीच ठार
शेवटचा पेपर देण्यासाठी जाणाऱ्या तरुणीला भरधाव ट्रालाने चिरडले नवी सावरट येथे भिषण अपघात
नवापूर- नवापूर येथे शेवटचा पेपर देण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या तरुणीला भरधाव ट्रालाने चिरडल्याने तरुणी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नवी सावरट गावाजवळ घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरती सुमन गावीत (२१,रा.वडखुंट) ही तरुणी नवापूर येथे आरटीआय महाविद्यालयात परिक्षा देण्यासाठी ये-जा करीत होती.दरम्यान गुरुवारी सकाळी आरती गावीत ही शेवटचा पेपर देण्यासाठी नवापूर येथे मोटारसायकलीने कृष्णा जोल्या गावीत (वय२३,पाटीबेडकी) यांच्यासोबत धुळे-सुरत महामार्गावरून जात असताना नवी सावरट गावाजवळ भरधाव ट्रालाने त्यांच्या दुचाकीला कट मारल्यामुळे दुचाकीस्वार कृष्णा जोल्या गावीत हा रस्त्यावर फेकला गेला तर आरती सुमन गावीत ही तरुणी ट्रालाखाली चिरडली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.जखमी तरुणाला नवापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मयत मुलीच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन गृह परिसरात दुःख प्रकट करुन एकच आक्रोश केला.याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प