सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण सत्राचे आयोजन

शासनाच्या वित्त विभागांमार्फत सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र

Sudarshan MH
  • May 18 2022 7:44PM

नंदुरबार, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या वित्त विभागांमार्फत सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र नाशिक यांच्यावतीने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्रमांक 101 चे  50 दिवसांचे प्रशिक्षणसत्र 13 जून 2022  ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 

24 जून 2015 शासन निर्णयानुसार वर्ग तीन राज्य शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी शासकीय सेवेत प्रवेश करतेवेळी पदस्थापनेपूर्वी  किंवा पदस्थापनेनंतर 6 महिन्यात पायाभूत प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. परंतू  कर्मचाऱ्यास पूर्णवेळ प्रशिक्षणास पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्यूलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती दिली जाईल. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे अर्ज 1 जून 2022 पर्यंत  सहसंचालक, लेखा व कोषागारे,नाशिक विभाग, वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र वित्तीय व्यवस्थापन संस्था, केंद्र नाशिक, लेखा कोष भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दे.ना.पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार