सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लग्नात आहेर केल्याच्या रागातून शिक्षक व त्यांच्या आईला मारहाण तलाठी येथील घटना

म्हसावद- लग्नात आहेर केल्याच्या रागातून एका शिक्षक

Nandurbar. MH
  • May 18 2022 7:05PM

म्हसावद-  लग्नात आहेर केल्याच्या रागातून एका शिक्षक तरुणाला व त्यांच्या आईला लोखंडी फायटर आणि लाकडी डेंगाऱ्याने बेदम मारहाण झाल्याची घटना तलाठी ता.शहादा येथे घडली आहे.याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश सुधीर पावरा हा लग्नात आहेर करायला गेला होता.याच्या रागातून  हिंमत ब्रिजलाल पावरा, भावसार सुभान पावरा, विनोद  दारासिंग पावरा,कल्याण सिंग भिमसिंग पावरा, ब्रिजलाल जयसिंग पावरा,प्रेमात ब्रिजलाल पावरा, विलास भिमसिंग पावरा सर्व रा.तलावडी यांनी शिक्षक दिपक मोतीलाल पावरा (२४,या.तलावडी)याला लोखंडी फायटर, हातातील अंड्यांचे व हाताबुक्क्याने बेदम मारहाण केली.सदर भांडण सोडविण्यासाठी लिफ्टची आई ताराबाई आली असता त्यांना डेंगाऱ्याने मारहाण केली.भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सुधीर पावरा, शिवदास पावरा, मोतीलाल पावरा मारहाण करून वाईट शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सदर घटना दि.१४मे रोजी रात्री ८ते९ वाजता घडली.याप्रकरणी दिपक पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास असई गुलाबसिंग पावरा करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार