नगरपालिका घरकुलमध्ये राडा मारहाण केल्याने ६ जणांवर गुन्हा
नंदुरबार- किरकोळ कारणावरून दोन कुटुबांत आपसात मारहाण झाल्याची घटना शहरातील सिव्हिल हॉस्पिटल समोरील
नंदुरबार- किरकोळ कारणावरून दोन कुटुबांत आपसात मारहाण झाल्याची घटना शहरातील सिव्हिल हॉस्पिटल समोरील नगरपालिकेच्या घरकुल वसाहतीत घडली आहे.याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून ६जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर पालिका घरकुल वसाहतीत रहिवासी सिमा प्रफुल्ल पाटील (२८)या आपल्या घरी असताना शेजारी राहणारे मोईनखान सफदरखान,गुड्डी खान मोईन,माया प्रभाकर नगराळे (सर्व रा.नंदुरबार) यांनी विनाकारण घरात घुसून हाताबुक्क्याने मारहाण केली.तसेच संसारोपयोगी साहित्य फेकून नुकसान केले. दुसऱ्या घटनेत गुड्डी खान मोईन खान (१९) सिमा प्रफुल्ल पाटील यांच्या पाण्याच्या टाकीत माती टाकली,असा संशय घेऊन सिमा प्रफुल्ल पाटील व सोहेल फिरोज खान(रा.नंदुरबार) या दोघांनी गुड्डी खान यांच्या घरात काठी घेऊन प्रवेश करुन गुड्डी खान यांना व त्यांची आई व बहिणीला हाताबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली.तसेच घरातील साहित्य फेकून नुकसान केले.सदर घटना दि.१५ मे रोजी अकरा वाजता घडली.याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हवालदार मालती वळवी करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प